

Baramati Car Accident
Esakal
Warkari Car Accident in Baramati: पंढरपूरच्या आषाढी वारीला सुरुवात झाल्यानंतर आठवड्याभरात दोन भीषण अपघात झाले आहेत. जेजुरीत वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसून तीन महिलांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता बारामतीत कारने वारकऱ्याला धडक दिल्याची घटना घडलीय. यात एका वृद्ध वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री हा अपघात झाला. या अपघातामुळे वारीत वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.