AI Agriculture Innovation: बारामतीच्या विद्यार्थ्यांची मोठी झेप; कृषी संशोधनासाठी भारत सरकारकडून डिझाईन पेटंट मंजूर

बारामतीतील विद्यार्थ्यांचा ‘AI-Powered Pest Detection and Organic Control System’ प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त; भारत सरकारकडून डिझाईन पेटंट मंजूर होऊन कृषी संशोधनात नवे पर्व
National Milestone: Baramati Agrotech Students Secure Design Patent from Government of India

National Milestone: Baramati Agrotech Students Secure Design Patent from Government of India

Sakal

Updated on

बारामती : कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेती यांचा संगम घडवणाऱ्या बारामतीतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्याप्रतिष्ठान कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, बारामती येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी पूर्वा रविंद्र वानखडे आणि त्यांचे वरिष्ठ शिवम सत्यम मद्रेवार यांना त्यांच्या “AI-Powered Pest Detection and Organic Control System” या अभिनव प्रकल्पासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून डिझाईन पेटंट मंजूर झाले आहे. अधिकृत नोंदणीतही या संशोधनाची पुष्टी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com