Abdul Sattar : कृषी प्रदर्शनासाठी अब्दुल सत्तार बारामतीत; पवारांबद्दल म्हणाले...

बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे आदर्श धडे थेट शिवारात पहावयास मिळतात. त्यामुळे बारामतीचे कृषी प्रदर्शन असो,अथवा भिमथडी असो त्यामध्ये वैशिष्टपूर्ण काहीतरी असतेच.
कृषी प्रदर्शन स्टाॅल
कृषी प्रदर्शन स्टाॅलsakal

माळेगाव : महाराष्ट्रसह देशात बहुतांशी वेळा कृषी प्रदर्शन स्टाॅल, कागदावर आणि भिंत्तीपत्रकाद्वारे पहावयास मिळतात.मध्यंतरी आम्ही सिल्लोड मध्ये (औरंगाबाद) असेच कृषी प्रदर्शन घेतले, परंतु बारामतीच्या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे आदर्श धडे थेट शिवारात पहावयास मिळतात.

त्यामुळे बारामतीचे कृषी प्रदर्शन असो,अथवा भिमथडी असो त्यामध्ये वैशिष्टपूर्ण काहीतरी असतेच.शेती विकासाचे ज्ञान देशभर पसरविण्यासाठी बारामतीचे कृषिक प्रदर्शन उपयुक्त आहे. अर्थात या शेतकरी हिताच्या गोष्टी पाहण्यासाठी मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून बारामतीला आलो आहे. राजेंद्रदादा ( पवार ) तुमचे कार्य़ उत्तम आहे, अशा शब्दात राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी बारामती कृषिक प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.

बारामती - शारदानगर येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित कृषिक २०२३ या कृषी प्रदर्शनाची सुरूवात राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार,विरोधीपक्षनेते अजित पवार,राजेंद्र पवार, सौ.सुनंदा पवार यांच्या उपस्थितीमुळे मोठ्या दिमाखात झाली.

यावेळी विश्वस्त रणजित पवार, विष्णूपंत हिंगणे, राजेंद्र देशपांडे, डॅा मगर, सीईओ निलेश नलावडे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, बारामती कृषीक प्रदर्शनामध्ये 170 एकर क्षेत्रावर विविध प्रकारचे प्रयोगशिल शेती प्लॅाट, निर्यातक्षम पालेभाजा व फळबागा, मशागतीची अवजारे, आधुनिक टेक्नॅालाजीच्या आधारे तयार केलेल्या मशनरींपासून ते मीनी रोबो ट्रॅक्टर पर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना पहावयास मिळत आहे.

त्या बद्दल कृषीमंत्री सत्तार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले,``शेतीमध्ये आगामी काळात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान, मीनी रोबो ट्रॅक्टर ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत.त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी या आधुनिक टॅक्नाॅलाॅजीला अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचा शासनस्तरावर प्रय़त्न आहे.

अर्थात त्याचे उत्तम उदाहरण बारामती कृषी विज्ञान केंद्रातील  प्रदर्शनातून शेतकऱ्यांना पहावयास मिळते,`` असे मत मंत्री सत्तार यांनी व्यक्त केले.

विशेषतः गुरुवार (ता.१९) हा प्रदर्शना पहिलाच दिवस असतानाही हजारो शेतकऱ्यांनी शेतीमधील ज्ञान तंत्रज्ञानाची भरपूर माहिती घेतली.

त्यामध्ये पुणे जिल्ह्यासह नगर, नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणि शेतीतज्ज्ञांची उपस्थिती लक्षवेधून घेत होती. यावेळी हे प्रदर्शन शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरण्यासाठी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र व बारामती अटल इंक्यूबेशन सेंटरच्या प्रशासनाने महत्वपुर्ण भूमिका घेतल्याचे दिसून आले.

कृषितंत्राने भारविणारे कृषिक प्रदर्शन

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले,`` शेतीच्या प्रात्यक्षिकांपासून कंपन्यांच्या तंत्रज्ञानापर्यंत आणि जनावरांच्या प्रदर्शनापासून भिमथडी जत्रेपर्यंत बारामती कृषी विज्ञान केंद्रातील कृषीकने हजारो शेतकऱ्यांची गर्दी खेचली. आधुनिक अवजारे व मशनरी, तसेच पिक प्रात्यक्षिकांबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीचे कृषी प्रदर्शन खरेतर देशभर दाखविण्याची गरज आहे.``

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com