Baramati
Baramati sakal

Baramati News : बारामती बँकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव यांची फेरनिवड

प्रीतम पहाडे तज्ज्ञ संचालक

बारामती - येथील बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव यांची आज झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत फेरनिवड करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदी सचिन सातव यांची तर तज्ज्ञ संचालकपदी प्रीतम पहाडे यांची फेरनियुक्ती झाली आहे.

दरम्यान उपाध्यक्ष रोहित घनवट यांचा उपाध्यक्षपदाचा तर श्रीनिवास बहुळकर यांचा तज्ज्ञ संचालक पदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आज बँकेच्या बैठकीत हा निर्णय झाला. गेल्या आर्थिक वर्षात बँकेने जवळपास सात कोटी नव्वद लाख रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता, बँकेचा एनपीए लक्षणीयरित्या खाली आणण्यात संचालक मंडळास यश प्राप्त झाले होते.

बँकेच्या आर्थिक सुधारणेच्या कार्यक्रमात सचिन सातव व प्रीतम पहाडे यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांचे राजीनामे घेतल्याने बारामतीच्या राजकीय वर्तुळातही आश्चर्य व्यक्त झाले होते. मात्र या दोघांनाही अजित पवार यांनी त्यांच्या जागी कायम ठेवत आगामी काळातील बँकेची जबाबदारी सोपविल्याने त्यांच्या कामगिरीवर पवार समाधानी असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

दरम्यान बारामती सहकारी बँकेचा एनपीए शून्य टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट असून आगामी काळात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष सचिन सातव यांनी नमूद केले. बँकेचे पुणे, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक व रायगड अशा सहा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असून बँकेच्या 36 शाखा व एक विस्तारीत कक्ष आहे. बँकेने गतवर्षात 3632 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com