

Baramati Bike Theft Cases Solved Police Recover 13 Bullet Bikes And Six Motorcycles Worth Rs 30 Lakh
esakal
बारामती : बारामती शहर व तालुका परिसरात वाढलेल्या बुलेट चोरीच्या घटनांना आळा घालत स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन ३० लाख रुपये किमतीच्या १९ मोटारसायकली हस्तगत केल्या. या कारवाईमुळे एकूण १९ गुन्ह्यांची उकल झाली आहे.