
राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना पाठिंबा का दिला?, असे म्हणून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. काळुराम चौधरी असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अशोक आजिनाथ माने (वय ४६, रा. इंदापूर) यांनी बारामती पोलिसांत फिर्याद दिली.
पुणे - राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांना पाठिंबा का दिला?, असे म्हणून बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणातील मुख्य आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. काळुराम चौधरी असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अशोक आजिनाथ माने (वय ४६, रा. इंदापूर) यांनी बारामती पोलिसांत फिर्याद दिली. माने हे बसपचे उमेदवार होते. बारामती-भिगवण रस्त्यावर कोर्ट कॉर्नर चौक परिसरात ११ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता. फिर्यादी हे मित्रांना भेटण्यासाठी गेले असता चौधरी याच्यासह सुमारे १५ जणांना त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांना दुचाकीवर बसवून घटनास्थळी नेले व तेथे त्यांच्या अंगावर काळा रंग आणि रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या खिशातील ४० हजार रुपये काढून घेतले व घोषणाबाजी केली, असे फिर्यादीत नमूद आहे. चौधरी व साथीदारांवर पाच गुन्हे दाखल आहे. पुढील तपासासाठी आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी केला.