Baramati | स्वच्छतेबाबत बारामतीकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन; महेश रोकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Municipal corporation
स्वच्छतेबाबत बारामतीकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन; महेश रोकडे

स्वच्छतेबाबत बारामतीकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन; महेश रोकडे

sakal_logo
By
मिलिंद संगई,

बारामती - शहर स्वच्छ करण्याच्या दृष्टीने नगरपालिका स्तरावर प्रयत्न सुरु करण्यात आले असून बारामतीकरांनी याला प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

स्वच्छता अभियानात बारामती नगरपालिकेला गेल्या दोन तीन वर्षात अजिबातच यश मिळाले नाही, या पार्श्वभूमीवर आता नगरपालिकेने यंदा काहीही करुन या अभियानात यश मिळवण्यासह शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. शहरातील घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून स्वताः मुख्याधिकारी दैनंदिन स्वच्छतेचा आढावा घेत आहेत.

या मध्ये बारामतीकरांकडून सहकार्य अपेक्षित असून नागरिकांनी काही मुलभूत बाबींचे पालन केल्यास नगरपालिकेला पुढील गोष्टी अधिक सोप्या होतील, असे रोकडे म्हणाले. कचरा उघड्यावर टाकू नये व ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करण्यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे.

कचरा विलगीकरणातून गोळा झाल्यास नगरपालिकेला ते अधिक सुलभ असेल, कालांतराने कच-यावर प्रक्रीया होणार असल्याने नागरिकांनी कचरा विलगीकरणावर भर दयावा असे महेश रोकडे यांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा: बारामतीच्या आयुर्वेदीक महाविदयालय व रुग्णालयासाठी 394 पदांची निर्मीती

नागरिकांनी हे करावे......

• ओला व सुका कचरा वेगळा गोळा करावा

• घंटागाडीशिवाय उघड्यावर कचरा टाकू नये

• प्लॅस्टिक कॅरीबँगसह प्लॅस्टिकचा वापर कमी करावा

• मोठ्या सोसायटींनी प्रक्रीया प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा

• ओला- भाज्या, पालेभाज्या, फळे, या शिवाय जो कचरा कुजतो

• सुका- जो कचरा कुजत नाही असा सर्व प्रकारचा

• प्लॅस्टिक कचरा वेगळा गोळा करावा.

असा गोळा कचरा ....

ओला कचरा - खरकटे, शिळे अन्न, कुजलेली फळे, पालेभाज्या, अंडयाची टरफले, चहा पावडर, मासे, मांस, केसांची गुंतावळ, कापलेली नखे, पालापाचोळा...

सुका कचरा - पॉलिथीनच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, थर्माकोलचे तुकडे, लोखंडी वस्तू, फाटलेले कपडे, कागदी बॉक्स, रबर, रद्दी

वेगळे गोळा करा - सॅनेटरी पॅड, डायपर, ब्लेड, फुटलेल्या काचा.

loading image
go to top