esakal | पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना 
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या आकड्याने आज शंभरी ओलांडली. आज कोरोनाग्रस्तांचा आकडा 104 पर्यंत जाऊन पोहोचला. दरम्यान रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता बारामती नगरपालिकेने दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार देखील रद्द करण्याचा निर्णय आज मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी घेतला.

पुण्यात पाठोपाठ बारामतीत पसरतोय कोरोना 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती - शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या आकड्याने आज शंभरी ओलांडली. आज कोरोनाग्रस्तांचा आकडा 104 पर्यंत जाऊन पोहोचला. दरम्यान रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता बारामती नगरपालिकेने दर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार देखील रद्द करण्याचा निर्णय आज मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी घेतला. शहरात तपासण्यांची संख्या वाढली, सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर संशयितांची तपासणी वेगाने होऊ लागल्याने आता काही काळ रुग्णांचा आकडा जास्तच येईल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. शहरात आजही घरोघरी जाऊन नगरपालिकेच्या वतीने सर्वेक्षण केले गेले. यात संशयित वाटणा-या रुग्णांना तातडीने दवाखान्यात तपासणीसाठी नेले जात होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील खाजगी रुग्णालयातही कोरोनारुग्णांची संख्या वाढू लागली असून आता गरज पडल्यास प्रशासनाच्या वतीने माळेगाव येथील वसतिगृहाचा वापर कोविड केअर सेंटर म्हणून करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे. 

कडक निर्बंध घालावेत
रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता काही निर्बंध लादले गेले पाहिजेत असा नागरिकातून सूर येत असून प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही त्या दृष्टीने आता विचार करत आहेत. दरम्यान, आज बारामती तालुक्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तीन हजार लस उपलब्ध करुन दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.

पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण

रविवारीही कोविशिल्ड लसीचे लसीकरण सर्व प्राथमिक  आरोग्य केंद्र व रुग्णालयात सुरु राहणार असून खाजगी दवाखान्यांनाही काही प्रमाणात यातील लस दिल्या जाणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून अनेक ठिकाणची लस संपल्याने लसीकरण थंडावले होते. गरजेनुसार लस उपलब्ध करुन देण्याची ग्वाही जिल्हाधिका-यांनी दिली आहे.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top