esakal | पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण 
sakal

बोलून बातमी शोधा

corona family

महाराष्ट्रात सध्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची स्थिती आहे. कारण पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

पुणे : कोरोना विषाणूचं वर्तन बदलतंय?; एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना होतेय लागण 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या कोरोना संसर्गाच्या (Corona infection) दुसऱ्या लाटेची स्थिती आहे, त्यातही पुणे जिल्हा (Pune District) आघाडीवर आहे. कारण पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर डॉक्टरांचं म्हणणं आहे की, यामागे एकतर विषाणूमधील हस्तांतरणाचं प्रमाण वाढलं आहे किंवा होम आयसोलेशनचे  प्रोटोकॉल (Home Isolation Protocol) योग्य प्रकारे पाळले जात नाहीत. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

मनसुख यांचा मृतदेह आढळलेला त्याच खाडीत आज आणखी एक मृतदेह सापडला

यासंदर्भात बोलताना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे (Dinanath Hospital) वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर म्हणाले, "वैद्यकिय विश्लेषणातून हे समोर आलंय की, कोरोना विषाणूच्या वर्तनात बदल होत आहे. कारण, गेल्यावर्षी बाधित व्यक्ती होम आयसोलेशनमध्ये असली तरी त्याच्या घरातील दोन किंवा तीन व्यक्तींपेक्षा अधिक लोकांना याचा संसर्ग होत नव्हता. मात्र, आता आपणं पाहतोय की, एकाच कुटुंबातील अनेक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे" मंगेशकर रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये सध्या १५० रुग्ण उपचार घेत आहेत. 

RSS च्या सरकार्यवाहपदी १२ वर्षानंतर नवीन चेहरा; भय्याजी जोशींच्या जागी दत्तात्रय होसबळे 

दरम्यान, जहांगीर रुग्णालयातील (Jehangir Hospital) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील अशाच प्रकारचा ट्रेन्ड दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, "मागच्या वेळी कोरोना विषाणू जितक्या वेगानं पसरला होता याच्या तुलनेत सध्या तो किती संसर्गजन्य आहे हे आपल्याला माहिती नाही. पण हे खरंय की जर कुटुंबातील एक व्यक्ती बाधित झाली तर त्याच्या घरातील दोन, तीन किंवा त्यापेक्षा अधिक लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत. पण यामध्ये चांगली गोष्ट ही आहे की त्यांची लक्षणं कमी तीव्रतेची आहेत.

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात वर्षा गायकवाड यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा

केईएम रुग्णालयाचे (KEM Hospital) वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुर राव म्हणाले, "अशी अनेक प्रकरणं समोर आली आहे की संपूर्ण कुटुंबचं कोरोना पॉझिटिव्ह आढळलं आहे. यामध्ये पती, पत्नी, मुलं, आई-वडील हे सर्वजण एकाच वेळी रुग्णालयांत दाखल होत आहेत. यांमध्ये ज्यांना कमी तीव्रतेची लक्षण आहेत त्यांना घऱीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जात आहे. तर ज्यांच्यामध्ये अधिक स्वरुपात लक्षण दिसून येत  आहेत तसेच त्यांना रेमडेसिविर सारख्या औषधांची गरज आहे अशांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येत आहे. अनेक कुटुंबं रुग्णालयात उपचार घेत असल्याचं आमचं निरिक्षण आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी लोकांना व्हेंटिलेटरची गरज भासते आहे. केईएम रुग्णालयात सध्या १३० कोविड-१९ चे रुग्ण उपचार घेत आहेत. 
 
गेल्या आठवडाभरात पुण्यात कोरोना विषाणूच्या संसर्गात झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी पुणे जिल्ह्यात ५,००० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. 

loading image
go to top