

Baramati ED Raids
esakal
Maharashtra ED News : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच आज (ता.१०) सकाळपासून बारामती तालुक्यातील जालोचीवाडी येथे ईडीने अचानक धाड टाकल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आनंद सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर ईडीची ही कारवाई होत असून १० कोटींची दूध डेअरीवाल्यांना फसवणूक केल्या प्रकरणात हा तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.