Baramati Elections : बारामतीत नगरपरिषद निवडणूकीचे वातावरण तापू लागले!

Municipal Election : नगरपरिषद निवडणूकीसाठी सोमवारपासून (ता. 10) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग व तयारी सुरु झाली आहे.
baramati elections 2025

baramati elections 2025

sakal
Updated on

बारामती : बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा खुले असल्याने सर्वाधिक चुरस व रस्सीखेच त्या पदासाठी होणार आहे. बारामती नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच आजपर्यंत वर्चस्व आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार दिला जाणार या बाबत कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी जय पाटील, सुभाष सोमाणी, शाम इंगळे, अभिजित काळे, प्रदीप शिंदे, करण वाघोलीकर, जयसिंग (बबलू) काटे देशमुख, शिवाजीराव कदम, अनिल कदम, विशाल जाधव, विक्रांत तांबे, सचिन सातव यांनी तसेच नगरसेवक पदासाठी 288 इच्छुकांनी अर्ज नेले असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

baramati elections 2025
Baramati Nagar Parishad Election : बारामतीत जय पवार यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची मागणी......
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com