Baramati News : बारामतीचे माजी अध्यक्ष आटोळेंची राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीत घरवापसी

शरद पवार गटात प्रवेश केलेले बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची आज पुन्हा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) पुण्यातील मेळाव्यात घरवापसी झाली.
baramati ex nitin atole join ajit pawar ncp party sharad pawar pune
baramati ex nitin atole join ajit pawar ncp party sharad pawar puneSakal

माळेगाव : शरद पवार गटात प्रवेश केलेले बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची आज पुन्हा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) पुण्यातील मेळाव्यात घरवापसी झाली.

 `महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाची घौडदौंड अधिक गतीने पुढे नेण्याची धमक उपमुख्यमंत्री अजितदादांमध्ये आहे. झालेले गैरसमज दूर ठेवत अजितदादांच्या कर्तुत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीत काम करण्याचे आम्ही ठरविले आहे,` अशी बदलती भूमिका नितीन आटोळे यांनी स्पष्ट केली. तसेच त्यांनी यापुढे संघटनात्मक काम करणार असल्याचे सांगितले.

पुणे जिल्ह्यासह बारामतीत राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी- शरद पवार गटाचे काम मजबूत उभे करण्यासाठी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी विशेष कृती आराखडा तयार केला आहे. त्या पार्श्वभूमिवर १८ जानेवारी रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीच्या कार्य़कर्त्यांची महत्वपुर्ण बैठक  गोविंद बागेत घेतली होती.

या बैठकीमध्ये स्थानिक राजकिय गटबाजीला कंठाळून बारामती दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे यांनी शरद पवार गटात जाहिर प्रवेश केला होता. तसेच त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष शेवाळे यांनी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारीही दिली होती.

परंतु २२ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आटोळे यांची पुन्हा आज (रविवारी) राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) पुण्यातील मेळाव्यात घरवापसी झाली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आटोळे यांनी पक्ष प्रवेश दिला.  या बदलत्या भूमिकेच्या पार्श्वभूमिवर आटोळे पत्रकारांशी बोलत होते.  

आटोळे म्हणाले,`` बारामती तालुक्याच्या राजकारणात गटबाजी खूपच पुढे आली आहे.  त्यामध्ये प्रामाणिक कार्य़कर्त्यांची तालुकास्तरावर काम करताना घुसमट होते. याबाबत अनेकदा अजितदादांकडे तक्रारी केल्या होत्या, आमच्या म्हणण्याकडे पाहिजे तेवढे लक्ष न दिल्याने आम्ही शरद पवार गटात प्रवेश केला होता.

परंतु शरद पवार गटाकडे शासनस्तरावर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस प्रोग्राम नसल्याचे प्रखरशाने जाणवले. याशिवाय अजितदादांनी आमचे म्हणणे समजून घेतले आणि यापुढे संघटनात्मक काम करण्यास प्रोत्साहन दिले जाईल, असे दादांकडून सांगितल्यानंतर आम्ही पुन्हा राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीत प्रवेश केला,``  असा खुलासा त्यांनी केला. यावेळी कार्य़कर्ते डी.डी.जगताप उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com