

बारामती : यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस बारामतीकरांनी शुक्रवारी (ता. 29) अनुभवला. शुक्रवारी पहाटे बारामतीचे किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यं खाली उतरले होते. कमालीच्या थंडीने बारामतीकर पार गारठून गेल्याचे चित्र शुक्रवारी अनुभवायला मिळाले. राज्यात आलेल्या थंडीच्या लाटेची तीव्रता बारामतीकरांनीही अनुभवली.