Independence Day : बारामतीच्या शेतक-याला दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात विशेष अतिथी म्हणून आमंत्रण

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून दोन दांपत्यांची निवड दिल्लीतील स्वातंत्र्यदिन समारंभासाठी करण्यात आली आहे.
Ashok Ghule and Mangal Ghule
Ashok Ghule and Mangal Ghulesakal

बारामती - तालुक्यातील ढेकळवाडी गावचे शेतकरी अशोक सुदाम घुले व त्यांच्या पत्नी मंगल घुले यांना स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणा-या ध्वजारोहण समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून दोन दांपत्यांची निवड या समारंभासाठी करण्यात आली आहे. त्यात बारामती तालुक्यातील घुले दांपत्याचाही समावेश आहे.

ही योजना सुरु झाल्यापासून अशोक घुले यांना या महिन्यापर्यंत नियमितपणे 14 हप्त्यात पैसे बँकेच्या खात्यात जमा झालेले आहेत. या मिळालेल्या पैशांचा विनियोग कसा केला, या बाबत घुले यांच्याकडे शासकीय स्तरावरुन विचारणा झालेली होती.

घुले यांनी दर महिन्यात मिळालेल्या दोन हजार रुपयात शेतीशी संबंधित सामान खरेदी केलेले होते. यात बियाणे, खते, औषधे यांचा समावेश होता. त्यांच्या या योजनेतील पैशांचा विनियोग उत्तम रितीने झाला व या पैशातून त्यांना शेतीतून अधिक उत्पन्न मिळण्यास मदत झाली या निकषमामुळे त्यांची विशेष अतिथी म्हणून निवड झाली आहे.

घुले यांच्याकडे साठ गुंठे जमीन असून त्यात त्यांनी उस व चारा पिकांची लागवड केली आहे. त्यांच्याकडे शेळ्या, गाई, म्हशी असे पशुधन असून दोघे पती पत्नी शेतात काबाडकष्ट करतात. रविवारी (ता. 13) ते स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

शेतक-याला सन्मान याचा आनंद

माझ्यासारख्या एका सामान्य शेतक-याला थेट स्वातंत्र्यदिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळते आहे याचा आनंद आहे. या योजनेतील पैशांचा विनियोग मी शेतीसाठीच केला होता.

- अशोक घुले, बारामती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com