

Baramati funeral theft gold ornaments
sakal
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधी दरम्यान चोरटयांनी किमान पंधरा जणांचे पंचवीस लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना बारामतीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी सहा चोरटयांची धरपकड केली असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.
अजित पवार यांच्या अंत्यविधीप्रसंगी 29 जानेवारी रोजी लाखाचा जनसमुदाय उपस्थित होता. या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत काही जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन व दागिने चोरटयांनी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या पैकी काही चोरटयांना नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले तर काहींना पोलिसांनी पकडले.