इंदापूर - बारामती तालुक्यातील सावळ गावची कन्या जान्हवी जीवन वीरकर हिची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली असून, या यशामुळे बारामती तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे..बारामतीच्या क्रीडा इतिहासात प्रथमच सावळसारख्या ग्रामीण भागातील एका मुलीने भारतीय महिला अंडर-१९ संघात स्थान मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवीच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण बारामती तालुका, सावळ गाव आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..ज्ञानसागर गुरुकुल, सावळ येथील विद्यार्थिनी असलेल्या जान्हवीने इयत्ता पाचवीपासून क्रिकेट खेळात सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि शिस्तबद्ध सरावाच्या जोरावर विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिच्या अथक प्रयत्नांचे फलित म्हणून तिला भारतीय महिला अंडर-१९ संघात स्थान मिळाले आहे. जान्हवीच्या यशामागे तिचे आई-वडील, प्रशिक्षक, शिक्षक आणि कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यात ती दमदार कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे..‘बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप’ ही केवळ एका खेळाडूची यशोगाथा नसून, ग्रामीण भागातील मुलींना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा जान्हवीने दिली आहे,’ असे प्रतिपादन ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर मानसिंग आटोळे यांनी केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.