Sharad Pawar : पत्रकारांनी सामान्य माणसाचा आवाज व्हायला हवे

बदलत्या परिस्थितीत देशातील माध्यमांचीही स्थिती बदलली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal

बारामती - बदलत्या परिस्थितीत देशातील माध्यमांचीही स्थिती बदलली आहे, पत्रकारांना स्वताःची स्वतंत्र भूमिका घेण्यास फारसा वाव नाही, कोणाच्या सूचनेनुसार नव्हे तर योग्य आणि न्याय्य बाजू असेल तर जरुर मांडली पाहिजे, सामान्य माणसाचा आवाज बनण्याचे काम पत्रकारांनी करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या वतीने ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, ज्येष्ठ संपादक श्रीराम पवार, ज्येष्ठ संपादक जयश्री खाडीलकर, ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांना पत्रकारितेतील जीवनगौरव पुरस्काराने शनिवारी (ता. 18) बारामतीत गौरविले गेले. त्या प्रसंगी पवार बोलत होते.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, सर्व पुरस्कारार्थी, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, ज्येष्ठ संपादक संजय आवटे, चंद्रमोहन पुपाला आदी या प्रसंगी उपस्थित होते.

या सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. शरद पवार यांनी या प्रसंगी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, स्व. नीळकंठ खाडिलकरांनी अनेकदा मुलाखती घेतल्या, राजनीती नावाचे वर्तमानपत्र मी काढले, सकाळचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम केले.

देशात आज अनेक राज्य भाजपच्या विरोधात आहेत. येत्या काळाच चित्र अजून बदललेले दिसेल. समाजाचा खरा आरसा दाखवायचा असेल तर प्रामाणिक पत्रकारितेची आवश्यकता आहे.

दरम्यान देशासमोर असलेली सामाजिक परिस्थिती वेगाने बदलते आहे, त्याला पूर्वपदावर आणण्याचे आव्हान पत्रकारांसमोर असल्याचे सांगून सुशीलकुमार शिंदे म्हणाले, व्हॉईस ऑफ मिडीया छोट्या पत्रकारांसाठी काम करते आहे ही बाब कौतुकास्पद आहे, सामाजिक परिस्थिती नीट राहायला हवी, त्यात पत्रकारांचीही भूमिका महत्वाची आहे.

सरकारचे दडपशाहिचे धोरण समाजहिताला मारक असल्याचे कुमार केतकर म्हणाले. जातीय तणाव वाढतो आहे, अनेक ठिकाणी पत्रकारितेवर बंधने आहेत, आज जगात अनेक ठिकाणी पत्रकारिता अडचणीत आहे, पुढील अधिवेशन ईशान्य भारतात घ्यायला हवे, जेणेकरुन तेथील अडचणी समोर येतील. 2024 मध्ये परिस्थिती आणखी चिघळू शकते, वास्तवाचे चित्रण करणे अनेक पत्रकारांना अवघड होऊन बसल्याचे ते म्हणाले.

या नंतर पुरस्कारार्थींची संजय आवटे यांनी प्रकट मुलाखत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com