

Baramati Rainfall Deficit Threatens Kharif And Rabi Seasons As Farmers Await Much Needed Retreating Monsoon Rains
sakal
-संगीता भापकर
मोरगाव : बारामती तालुक्यात सप्टेंबर महिना सरत आला तरी समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदा केवळ ४.४ टक्के पाऊस पडला आहे. पावसाअभावी खरिपासह रब्बी हंगामही धोक्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची आशा लागून राहिली आहे.