बारामतीत एसटी आगाराने घेतला मोठा निर्णय, आता होणार...

मिलिंद संगई
Thursday, 31 December 2020

एसटीने आता पारंपरिकता बाजूला सारत व्यावसायिकता अंगी बाणवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. उत्पन्नवाढीला पर्याय नाही ही बाब एसटीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लक्षात आली असून आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. 

बारामती : एसटीने आता पारंपरिकता बाजूला सारत व्यावसायिकता अंगी बाणवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. उत्पन्नवाढीला पर्याय नाही ही बाब एसटीच्या अधिकारी आणि कर्मचा-यांच्या लक्षात आली असून आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. बारामती एमआयडीसी आगाराच्या वतीने आगारप्रमुख गोविंद जाधव यांच्या पुढाकारातून कोकण दर्शन, अष्टविनायक दर्शन तसेच गाणगापूर दर्शन गाड्या सुरु करण्यात आल्या असून प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अत्यंत वाजवी दरात या सहली होत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे गोविंद जाधव म्हणाले. कोकण दर्शनची बस बारामतीतून निघून कोयनानगर धरण, तेथील उद्यान, डेरवण, संगमेश्वर करुन गणपतीपुळे येथे मुक्कामास जाणार आहे, दुस-या दिवशी रत्नागिरी दर्शन करुन मार्लेश्वर करुन पुन्हा बारामतीला परत येणार आहे. 1020 रुपये प्रवासखर्चात (फक्त प्रवासभाडे) ही सहल होणार आहे. 

अष्टविनायक दर्शन सहलीत बारामतीहून मोरगाव, थेऊर, सिध्दटेक, रांजणगाव करुन ओझरला मुक्काम असून दुस-या दिवशी लेण्याद्री, पाली व महाड करुन बारामतीला परत येणार आहे. 930 रुपये प्रवासखर्चात (फक्त प्रवासभाडे) ही सहल होईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती गाणगापूर दर्शन बस बारामतीतून अक्कलकोट मार्गे गाणगापूरला मुक्कामी जाते. दुस-या दिवशी पुन्हा बारामती परत येते. या सर्व सहलींचे आगाऊ बुकींग बारामती व एमआयडीसी बसस्थानकावर प्रवाशांसाठी सुरु करण्यात आले असून एसटीच्या संकेतस्थळावरही प्रवासी करु शकतात. अधिक माहितीसाठी गोविंद जाधव- 8329579156, घनशाम शिंदे- 9421480813 किंवा देगलूरकर- 9881266039 यांच्याशी संपर्क साधावा.

जाणून घ्या केसरचे फायदे; हाडांची मजबूती, कँसरशी लढा आणि उत्तम सेक्स लाईफ देतो केसर  

रामोजी फिल्म सिटीसाठीही बसची सुविधा...पुण्यातून एसटीच्या वतीने रामोजी फिल्म सिटीसाठी व्होल्वो बस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या बसला बारामतीतून कनेक्शन देण्यात आले असून बारामतीकर प्रवासीही रामोजी फिल्म सिटीचा आनंद घेऊ शकतात, असेही गोविंद जाधव यांनी सांगितले. 

(संपादन : सागर डी. शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Baramati to Konkan Darshan, Ashtavinayak Darshan and Gangapur ST buses have been started