Baramati : विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केला संविधान दिन साजरा

राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक पद्धतीने वाचन केले
Baramati
Baramati Sakal

माळेगाव : भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने आज बारामती शारदानगर येथे महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक पद्धतीने वाचन केले.

यावेळी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे, एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, बारामती तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी कार्यकर्ते रविराज तावरे, बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, माळेगाव नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता काळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, बारामती परिमंडलचे मुख्य अभियंता सुनील पावडे, एग्रीकल्चर ट्रस्टचे सीईओ निलेश नलवडे, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता प्रवीण घोरपडे, अश्विन पवार, ऑफिस बातमीपत्र आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, श्री. पवार म्हणाले, 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निमित्ताने निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चा नंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 19 49 रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, असे मत त्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, भारतीय संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत, राजकीय संहिता संरचना , कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांची कर्तव्य निर्धारित करणारी चौकट मांडतो. हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे, असे पवार यांनी बोलून दाखवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com