Sunetra Pawar Baramati Loksabha : आला प्रचार रथ फक्त घोषणा बाकी? बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित

बारामती शहरामध्ये सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारा प्रचार रथ फिरू लागल्यामुळे सुनेत्रा पवार याच आगामी उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे.
baramati lok sabha election candidate sunetra pawar politics
baramati lok sabha election candidate sunetra pawar politicsSakal

बारामती : लोकसभा निवडणूकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची अधिकृत घोषणा होणे आता बाकी आहे. शुक्रवारी (ता.16) सकाळपासूनच बारामती शहरामध्ये सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारा प्रचार रथ फिरू लागल्यामुळे सुनेत्रा पवार याच आगामी उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे.

काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार असे आता जवळपास निश्चित झाले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहे. सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी असून अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याबाबत कमालीची उत्सुकता होती.

देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिले जाईल हे आता निश्चित आहे. बारामतीत झालेल्या मेळाव्यामध्ये अजित पवार यांनी मीच उमेदवार आहे असे समजून प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन केले होते. त्याच वेळेस सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारा प्रचार रथ फिरू लागल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान काल सुनेत्रा पवार यांनी आमदार राहुल कुल व त्यांच्या पत्नी कांचन कुल यांची देखील त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित होते. त्यावर आज किंवा येत्या काही दिवसात अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com