Baramati News : भाजपने बारामतीची निवडणूक घेतली गांभीर्याने

देशातील हायव्होल्टेज लढत असलेली बारामतीची निवडणूक आता भाजपच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचा विषय बनली आहे.
bjp party baramati
bjp party baramatisakal

बारामती - देशातील हायव्होल्टेज लढत असलेली बारामतीची निवडणूक आता भाजपच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. महायुतीमध्ये जरी राष्ट्रवादीला बारामतीची जागा मिळाली असली तरी ही जागा निवडून आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

भाजपच्या वरिष्ठ स्तरावर ही निवडणूक गांभीर्याने घेतली जात असून त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी बारामतीत आज भाजपच्या प्रमुखांची तातडीची बैठक घेत, केंद्रीय नेतृत्वाचा निरोप पदाधिका-यांपर्यंत पोहोचविला. भाजपने आपल्या स्तरावर ही जागा खेचून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बहुमताने विजयी करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी हिरिरीने काम करावे, अशी सूचना भाजपचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांनी दिल्या.

बारामतीत आज तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये त्यांनी या सूचना दिल्या. या बैठकीसाठी भाजपा मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, पुणे जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, बाळासाहेब गावडे, योगेश बाचल, नवनाथ पडळकर, अशोक टेकवडे, कांचन कुल, शरद ढमाले, जालिंदर कामठे, शेखर वडणे, आकाश कांबळे, अभिजीत देवकाते व बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बूथ समितीवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत करुन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचा, सुनेत्रा पवार यांना मोठ्या बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, शेतकरी, महिला, युवक, मागासवर्गीय, ओबीसी, आदिवासी व समाजातील वंचित घटक यांच्यासाठी मोदी सरकारने केलेले क्रांतिकारी निर्णय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे अशाही सूचना शिवप्रकाश यांनी दिल्या.

वासुदेव काळे यांनी बैठकीमागील पार्श्वभूमी विशद करत महायुतीच्या उमेदवारासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज या प्रसंगी बोलून दाखवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com