Jay Pawar : खासदारांना संसदरत्न मिळाले पण भोरला काय मिळाले

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांना तुम्ही तीन वेळा निवडून दिले, मात्र भोरचा हवा तसा विकास झाला नाही.
Jay Pawar
Jay Pawarsakal

भोर - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांना तुम्ही तीन वेळा निवडून दिले, मात्र भोरचा हवा तसा विकास झाला नाही. खासदरांना संसदरत्न पुरस्कार मिळाले पण भोरला काय मिळाले ? असा प्रश्न जय पवार यांनी उपस्थित केला. सोमवारी (ता.२२) जय पवार भोरच्या दौ-यावर असताना खानापूर येथे सुनेत्रा पवार यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, युवानेते विक्रम खुटवड, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, भाजपाचे अमर बुदगुडे, समीर घोडेकर, महिलाध्यक्षा विद्या पांगारे, मनोज खोपडे, अविनाश गायकवाड, सचिन पाटणे, नितीन थोपटे, प्रवीण जगदाळे, राजेंद्र थोपटे, संपत तनपुरे, रोहन भोसले, अनिकेत कोंढाळकर, दत्ता थोपटे, सुनील साळवी, प्रकाश तनपुरे आदी प्रमुख मान्यवरांसह राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जय पवार म्हणाले, आजपर्यंत भोर तालुक्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे. दादा सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असतात. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना एकदा खासदारकीची संधी द्या, संधीचे सोने करून दाखवू. असा विश्वासही जय पवार यांनी व्यक्त केला.

सोमवारी दिवसभरात जय पवार यांनी विसगाव खोऱ्यातील भाबवडी, खानापूर, पोळवाडी, आंबाडे, पळसोशी, वरोडी, धावडी व बाजारवाडी या गावातील मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. बारामती लोकसभा मतदारसंघात बदल अटळ असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व पदाधिका-यांनी जय पवार यांना दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com