Ramdas Athawale : संविधान बदलण्याचा विरोधक खोटा प्रचार करीत दिशाभूल करीत आहेत

लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगत संविधान बदलण्याचा विरोधक खोटा प्रचार करीत दिशाभूल करीत आहेत.
Ramdas Athawale
Ramdas Athawalesakal

खळद - लोकशाही धोक्यात आली असल्याचे सांगत संविधान बदलण्याचा विरोधक खोटा प्रचार करीत दिशाभूल करीत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलले जाणार नाही, जर कोण ते बदलणार असतील तर आम्ही त्यांना फाडून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास पुरुष असून विकासाच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे ते कधीही संविधान बदलणार नाहीत असा आमचा विश्वास आहे, म्हणूनच आम्ही त्यांच्या, महायुतीच्या सोबत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सांगितले.

खळद (ता. पुरंदर) येथे माऊली गार्डन मंगल कार्यालयात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,माजी आमदार अशोक टेकवडे, संभाजी कुंजीर, पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, बाबा जाधवराव, दिलीप यादव, बाळासाहेब कामथे, शरद जगताप, दत्तात्रेय झुरंगे, विक्रम शेलार, विराज काकडे, सुर्यकांत वाघमारे, परशुराम वाडेकर, पंकज धिवार, स्वप्निल कांबळे, उत्तम धुमाळ, विष्णूदादा भोसले, निलेश जगताप, परवीन पानसरे, वंदना जगताप, शांताराम कापरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आठवले यांनी पूर्वीच्या सरकारचा कारभार हा भ्रष्ट असल्याचे सांगत मोदी सरकारच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी मुद्रा आवाज योजना, उज्वला आवाज योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना यासारख्या वेगवेगळ्या योजना राबविल्या असून त्याचा कोट्यावधी नागरिकांनी फायदा घेतल्याचे, रस्ते, रेल्वे याबाबत झालेली प्रगती सांगत त्यांचा विकासाचा दृष्टिकोन समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर मोदी हे विकासाच्या दृष्टीने पुढे वाटचाल करीत असल्याने सर्वांनी २०२४ ला एनडीएला म्हणजेच सुनेत्रा पवार यांना मतदान करावे असे घरोघरी जाऊन सांगावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांनी केले, सुत्रसंचालन शरद जगताप यांनी तर आभार स्वप्निल कांबळे यांनी मानले.

'शरद पवार यांनी महायुतीत यायला हवे होते,ते विकासाच्या दिशेने जाणारे नेते होते, परंतु काँग्रेस पक्षाने त्यांना काढून टाकल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेस बरोबर न जाता नरेंद्र मोदींना, विकासाला, देशाच्या प्रगतीला साथ द्यायला हवी होती.'

- रामदास आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com