Baramati News : पवार कुटुंबियांची सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ उपस्थिती

लोकसभेच्या रणसंग्रामाला बारामतीत आजपासून (ता. 19) ख-या अर्थाने प्रारंभ झाला.
sharad pawar
sharad pawarsakal

बारामती - लोकसभेच्या रणसंग्रामाला बारामतीत आजपासून (ता. 19) ख-या अर्थाने प्रारंभ झाला. पुण्यात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शुक्रवारी (ता. 19) सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा परंपरेनुसार श्री क्षेत्र कण्हेरीतून प्रारंभ झाला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह या प्रसंगी पवार कुटुंबिय उपस्थित होते. आजच्या सभेला राजेंद्र पवार, सुनंदा पवार, रोहित पवार, श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार, रणजित पवार, शुभांगी पवार, देवयानी पवार व ईरा पवार उपस्थित होते.

आजच्या प्रचाराच्या प्रारंभाप्रसंगी युगेंद्र पवार, रोहित पवार यांनीही सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ भाषण करुन सुप्रिया सुळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

....तुम्ही गुरुजीच ना......

कण्हेरीच्या प्रचारसभेत भाषणाला उभे राहिल्यावर गर्दीत बसलेल्या एका टोपीवाल्या गृहस्थांकडे बघून पवार यांनी तुम्ही गुरुजीच ना....असे स्मितहास्य करुन विचारल्यानंतर गुरुजींनी होकारार्थी मान डोलावली. शरद पवारांची तल्लख स्मरणशक्ती पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. साहेब संरक्षणमंत्री असताना माझ्या मुलाच्या लग्नासाठी खास दिल्लीहून आले होते, असे पांडुरंग झगडे यांनी सभेनंतर सांगितले. सभा संपल्यावर साहेबांच्या स्मरणशक्तीचीच सगळीकडे चर्चा होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com