Baramati News : विजय गव्हाळे लढविणार बारामतीची निवडणूक

बारामती येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली.
Vijay Gavhale
Vijay Gavhalesakal

बारामती - येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली.

बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गव्हाळे म्हणाले, सध्याची स्थिती ही विस्थापीत व प्रस्थापित यांच्या लढाईची असून मी विस्थापितांचा प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविणार आहे. जे मतदार दोन्ही पवारांना कंटाळलेले आहेत, त्यांना एक समर्थ पर्याय म्हणून मी उमेदवारी दाखल करत आहे.

राजकारणात कोणीच आपल्याला वरचढ होऊ नये याची काळजी पवार कुटुंबियांनी कायमच घेतली आहे, जनतेला वेठीस धरण्याचे, अनेक कर्तृत्ववान माणसे संपविण्याचे काम त्यांनी केले आहे.

केवळ रस्ते करुन व इमारती बांधून विकास होत नाही, हा बेगडी विकास आहे, या ठिकाणचा 83 टक्के युवक हा सुशिक्षीत बेरोजगार आहे. हजारो लोक आजही झोपडपट्टीत राहतात, मात्र कालवा व नदी सुशोभिकरणावर कोटयवधींचा निधी पाण्यात घालविला आहे. उपेक्षितांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष झालेले आहे.

बारामतीचा विकास करताना तोडफोड, नुकसान या मुळे लोक विकासाला वैतागलेली आहेत. दूरदृष्टीचा विचार न करता विकासकामे सुरु आहेत. विकास केला तो फक्त शहराचाच, तालुक्यात काहीच विकासकामे झालेली नाहीत. दलित समाज घटकांना कोठेही स्थान दिले जात नाही, आमचा निधी सातत्याने पळवला जातो, असा आरोप करत मराठा व धनगर समाजासह आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी उमेदवारी जाहीर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com