Amol Mitkari : आगामी निवडणूकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील

ज्यांच्याकडे 145 आमदारांचे संख्याबळ आहे, तेच या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, त्या मुळे कुणीही घाई करु नये.
Amol Mitkari
Amol Mitkariesakal

बारामती - ज्यांच्याकडे 145 आमदारांचे संख्याबळ आहे, तेच या राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात, त्या मुळे कुणीही घाई करु नये, आगामी विधानसभा निवडणूकीत अजित पवार हे जास्तीत जास्त जागा निवडून आणून राज्याचे मुख्यमंत्री निश्चित होतील, असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.

बारामती गणेश फेस्टीव्हलमध्ये त्यांचे व्याख्यान आहे, त्या निमित्ताने ते बारामतीत आले होते. त्या प्रसंगी माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही भावना व्यक्त केली.

आजही अनेक आमदार व खासदार हे अजित पवार यांच्य पाठीमागे उभे आहेत, नागालँडच्या आमदारांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे, सर्वांनीच आता त्यांचे नेतृत्व स्विकारलेले आहे, अनेक आमदार संपर्कात आहेत, अनेक जण वाटेवर आहेत, लवकरच ते आमच्यात आलेले आपल्यला दिसतील असे मिटकरी म्हणाले.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली. मनोज जरांगे पाटील हे राज्यभर फिरणार असतील तर त्यांच्या दौ-याला आमच्या शुभेच्छा आहेत, असेही त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली असल्याने आमचीही तिची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com