बारामतीत महावीर जयंती उत्साहात साजरी

मिलिंद संगई
गुरुवार, 29 मार्च 2018

बारामती शहर - भगवान महावीर जयंतीनिमित्त आज बारामती शहरातून जैन समाजाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी जैन समाजाची महावीर पथ येथील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदीरापासून मिरवणूक काढण्यात आली. 

या मिरवणूकीत दिगंबर, श्र्वेतांबर, स्थानकवासी जैन समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गांवरुन ही मिरवणूक काढली गेली. 

तसेच स्व. माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीमध्ये भारतीय जैन संघटनेच्या बारामती शाखेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले गेले. या शिबीरात 71 बाटल्या रक्तसंकलन झाले. यात 12 महिलांनी रक्तदान केले. महेश ओसवाल, आनंद छाजेड, विपुल वडूजकर, आदित्य वडूजकर, संदेश खटावकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी या शिबीराचे आयोजन केले. 

Web Title: baramati mhavir jayanti elebration