बारामतीकरांनो, एमआयडीसी ते मेडद बाह्य वळण रस्त्याबाबत महत्वाची अपडेट 

मिलिंद संगई
Wednesday, 7 October 2020

बारामती एमआयडीसीतून मेडदपर्यंतचा हा बाह्यवळण रस्ता असून एमआयडीसीतील लोकांना पुण्याला जाताना या रस्त्याचा फायदा होणार आहे. 

बारामती : शहराच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नवीन रिंग रोडचे काम येत्या काही दिवसात पूर्णत्वास येऊन यावरील वाहतूक प्रत्यक्षपणे सुरु होणार आहे. बारामती एमआयडीसीतून मेडदपर्यंतचा हा बाह्यवळण रस्ता असून एमआयडीसीतील लोकांना पुण्याला जाताना या रस्त्याचा फायदा होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एमआयडीसीतील आयएसएमटी रेल्वे क्रॉसिंगपासून सुरु होणारा हा रस्ता पाटस रस्त्याला ओलांडून पुढे क-हा नदीवरील पूल ओलांडून शरयू टोयाटा शोरुम नजिक बारामती मोरगाव रस्त्याला मिळणार आहे. तेथून पुढे हा रस्ता कृषी विज्ञान केंद्रावरुन पुढे माळेगाव रस्त्याला जाऊन मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारामती एमआयडीसी ते मोरगाव रस्त्यापर्यंत 8 कि.मी. लांबीचा हा बाह्यवळण रस्ता आहे. क-हा नदीवरील पूलाचे काम पूर्ण झाले असून मुख्य रस्ता ते पूलापर्यंतच्या अँप्रोच रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे. मोरे वस्तीकडील आठ शेतक-यांचा जागेबाबत आक्षेप असून त्यांच्याशी सध्या चर्चा सुरु आहेत. मेडद ते कृषी विज्ञान केंद्रापर्यंतच्या रस्त्याच्या जागेबाबत काही शेतक-यांचे काही आक्षेप असून हाही रस्ता अद्याप सुरु झालेला नाही. 

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

बारामतीतून पुण्याला जाणा-यांची दैनंदिन संख्या लक्षणीय असते. त्यातही एमआयडीसी परिसरातून मोरगावमार्गे पुण्याला जायचे असल्यास बारामती शहरातून किंवा रेल्वे उड्डाणपूलामार्गे जावे लागते. हा रस्ता खुला झाल्यानंतर थेट बाह्य वळण रस्त्याने मेडदनजिक शरयू शोरुमनजिक लोकांना पोहोचता येईल. या मुळे वेळ व अंतरही वाचणार असून बारामती शहरातील वाहतूकीचा ताणही आपोआपच कमी होणार आहे. 

काही शेतक-यांसोबत बारामती नगरपालिकेची बोलणी सुरु असून त्यांचा वाद संपुष्टात आल्यानंतर हा रस्ता प्रत्यक्षात वापरास खुला होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati MIDC to Medad bypass road will start soon