बारामती-मोरगाव-जेजुरी रस्ता होणार आता तीन पदरी

मिलिंद संगई
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

बारामती शहर - वाहतूक जलदगतीने व्हावी व अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या साठी बारामती-मोरगाव-जेजुरी हा रस्ता तीन पदरी होणार आहे. यामुळे पुण्याला जातानाचा बारामतीकरांचा वेळ वाचणार असून, वाहतूक जलद गतीने होईल. 

राज्य शासनाने नव्याने हाती घेतलेल्या हायब्रिड अँन्यूटी प्रोग्राम अंतर्गत मोरगाव-बारामती-कळंब-बावडा-नीरानरसिंगपूर हा रस्ता तीन पदरी करण्यात येणार आहे. राज्यातील काही महत्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण या प्रकल्पाअंतर्गत केले जाणार असून, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम होणार आहे. हा संपूर्ण मार्ग सध्या दुपदरी आहे. त्याचे काम करुन तो तीन पदरी करण्यात येईल. 

विशेष म्हणजे कोणतेही अतिरिक्त भूसंपादन न करता उपलब्ध जागेतूनच हा रस्ता करण्यात येणार असून हा रस्ता करताना काही धोकादायक वळणे काढून रस्ता सरळही केला जाणार आहे. सात मीटर रुंदीचा हा रस्ता आता दहा मीटर होईल, या मुळे दोन वाहने सहजतेने जाऊ शकतील, ओव्हरटेकही सहजतेने करता येईल. 

दरम्यान, जेजुरी-मोरगाव-सुपा हा रस्ता देखील अष्टविनायक मार्गामध्ये तीन पदरी होणार असल्याने बारामती-मोरगाव-जेजुरी हा रस्ता तीन पदरीमध्ये लवकरत रुपांतरीत होणार आहे. मोरगाव ते नीरा नरसिंगपूर या रस्त्याचे काम दोन महिन्यात सुरु होईल अशी अपेक्षा आहे. दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा हा रस्ता असल्याने या रस्त्याचे कामही लवकर व्हावे असा सार्वजनिक बांधकाम विभागाचाही प्रयत्न आहे. 

प्रवास होईल अधिक सुखकर....
बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी बारामती-मोरगाव-जेजुरी-सासवड या रस्त्याचा वापर सर्वाधिक होतो. जेजुरी ते दिवे घाटापर्यंत रस्ता रुंद झालेला आहे, बारामती ते जेजुरीपर्यंत रस्ता रुंदीकरणाची मागणी होती. तीन पदरी रस्ता झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतूक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे.

Web Title: Baramati-Morgaon-Jejuri road will now have three lanes