Loksabha 2019 : हर्षवर्धन पाटलांशी राजकारणापलिकडे कौटुंबिक स्नेह : सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
मंगळवार, 2 एप्रिल 2019

राजकारणापलिकडे जाऊन सर्वच पक्षातील प्रमुखांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत आणि केवळ निवडणूकीपुरतेच हे संबंध नसतात तर पाच वर्षात मी असे संबंध वैयक्तिकस्तरावर जपते, त्या मुळे मला सर्वच क्षेत्रातून लोक मदत करीत आहेत. निवडणूक म्हणजे परस्परांशी शत्रुत्व असे मी कधीच मानत नाही, असेही सुळे म्हणाल्या.

बारामती : हर्षवर्धन पाटील व माझे संबंध उत्तम आहेत, केवळ राजकारणापुरतच नाही तर राजकारणापलिकडे आमचा कौटुंबिक स्नेह आहे, त्यामुळे ज्या काही बातम्या वर्तमानपत्रातून येतात त्या वाचून आमचे मनोरंजन होते, अशा शब्दात आज सुप्रिया सुळे यांनी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील सर्वतोपरी मदत करणार असल्याचे नमूद केले. 

आज (मंगळवार) ज्येष्ठ नेते शरद पवार, हर्षवर्धन पाटील व सुप्रिया सुळे यांच्यात पुण्यात चर्चा झाली. त्या नंतर सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी हा खुलासा केला. 
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिलेले असून आज इंदापूर तालुक्यात मी आणि हर्षवर्धन पाटील बूथ प्रमुखांशी संवाद साधणार आहोत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे आणि दोन्ही पक्षांकडून आघाडी धर्माचे पालन व्यवस्थित केले जात आहे. 

राजकारणापलिकडे जाऊन सर्वच पक्षातील प्रमुखांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत आणि केवळ निवडणूकीपुरतेच हे संबंध नसतात तर पाच वर्षात मी असे संबंध वैयक्तिकस्तरावर जपते, त्या मुळे मला सर्वच क्षेत्रातून लोक मदत करीत आहेत. निवडणूक म्हणजे परस्परांशी शत्रुत्व असे मी कधीच मानत नाही, असेही सुळे म्हणाल्या.

Web Title: Baramati MP Supriya Sule meet Congress leader Harshvardhan Patil