बारामती नगरपालिकेचे दाखले आता ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

बारामती शहर - विविध दाखले व परवानगी यासाठी या पुढील काळात बारामतीकरांना नगरपालिकेत हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. सरकारच्या निर्देशानुसार आता नगरपालिकेतून सर्व दाखले व परवानगी ऑनलाइन दिली जाणार आहे. मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी याबाबत माहिती दिली.

बारामतीकरांना नगरपालिकेकडून विविध दाखल्यांची तसेच परवानगी यांची आवश्‍यकता भासते. यासाठी इतक्‍या दिवस नगरपालिकेत अर्ज करण्यापासून प्रत्यक्ष दाखला मिळविण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते. अनेकदा अधिकारी, कर्मचारी जागेवर नसण्यापासून विविध कारणांनी लोकांचा वेळ यात वाया जात होता.

आता मात्र नगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन सर्व दाखल्यांसह परवानगीसाठी नागरिक ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रारंभ प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, प्लिंथ सर्टिफिकेट, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला यासह इतरही कागदपत्रे ऑनलाइन मिळू शकतील. ज्या दाखल्यांसाठी काही शुल्क आकारणी केली जाते, ते शुल्कही नागरिक ऑनलाईन पेमेंटद्वारे भरू शकतील, त्यासाठी त्यांना चलन घेऊन पुन्हा बॅंकेत जात बसायची गरज भासणार नाही.

व्यवस्थित अर्ज भरून आवश्‍यक कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केल्यावर मुख्याधिकारी ठराविक दिवसांत दाखला किंवा परवानगी देणार आहेत. यामुळे नगरपालिकेवर येणारा ताणही निश्‍चित कमी होणार आहे. नागरिकांनी ऑनलाइन प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन योगेश कडुसकर यांनी केले आहे.

Web Title: baramati municipal certificate online

टॅग्स