

Reason Behind Postponement of Baramati’s Two Wards
Sakal
बारामती : न्यायालयीन प्रक्रीयेच्या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेच्या दोन प्रभागातील निवडणूक पुढे जाणार असल्याचे आज स्पष्ट झाले. प्रभाग 17 अ तसेच प्रभाग 13 ब मधील उमेदवारांचे अर्ज जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्विकारण्यात आले आहेत. या दोन जागांसाठी 26 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात आले आहे. या दोन नामनिर्देशन पत्रांबाबत पुढील प्रक्रीयेविषयी (छाननी, उमेदवारी माघारी घेणे, इत्यादी) बाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिका-यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. या दोन जागा वगळून नगराध्यक्ष व इतर सर्व जागांसाठीचा उर्वरित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे.