Baramati Crime: पत्नीनेच केली होती पतीची हत्या; दहा महिन्यानंतर झाला उलगडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati Crime

Baramati Crime: पत्नीनेच केली होती पतीची हत्या; दहा महिन्यानंतर झाला उलगडा

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिसांना 10 महिन्यांपासून चकवा देणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे. 10 महिन्यापूर्वी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील एक तरून बेपत्ता झाला होता.

काही दिवसांनी त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला. या तरूणाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आला मात्र या तरुणाची हत्या कोणी केली, आणि कशासाठी याचा शोध लागत नव्हता.

कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी शोध सुरू केला आणि अखेर आरोपींचा छडा लावला. यामध्ये आरोपी रोहीत दत्तात्रय खोमणे वय 29 वर्ष , वृषाली वैभव यादव वय 23 वर्ष, सागर सर्जेराव चव्हाण वय 27 वर्ष, दादा श्रीधर सुर्यवंशी वय 23 वर्ष ,सर्व रा. वडगाव निबांळकर, ता. बारामती, या आरोपींनी वैभव विठ्ठल यादव याची अनैतिक संबंधातून हत्या केली होती.

हेही वाचा: Aaditya Thackeray: "दारु पितानाचे फोटो व्हायरल करणार"; निलेश राणेंची आदित्य ठाकरेंना धमकी

आरोपींनी वैभव विठ्ठल यादवला त्याच्या घरासमोरुन वँगनर गाडीतून शेजारील गावात नेले. त्यानंतर त्याला दांडक्याने, ऊसाने, लाथा बुक्याने, जबर मारहाण करुन हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत पाडेगाव ता. फलटन, जि. सातारा येथील निरा उजवा कालव्यात टाकून दिले होते.

मृत वैभवच्या पत्नीचे रोहित खोमणे याच्याशी अनैतिक संबंध होते. यात वैभव अडथळा ठरत असल्याने, रोहित आणि साथीदारांच्या मदतीने वैभवचा खून केल्याचे कबूली दिली.

टॅग्स :Baramatipolicecrime