Fight with Corona : बारामतीकरांसाठी नगर परिषदेनं तयार केलं 'स्पेशल' अॅप; एका क्लिकवर समजणार सर्वकाही!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

बारामतीमधील हॉस्पिटल्स, क्वॉरन्टाईन सेंटर व आयसोलेशन सेंटर याबद्दलची सविस्तर माहिती यात दिली आहे.

बारामती : येथील नगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणूंचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी 'बीएनपी केअर्स' या अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.३) या अॅपचे अनावरण करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या अॅपमुळे नागरिकांना त्यांच्या प्रश्नांच्या उत्तराच्या आधारे स्वचाचणी करता येईल व कोरोनाबाबत घ्यायच्या काळजीची माहिती होईल. या अॅपच्या मदतीने विविध ठिकाणचे संपर्क क्रमांक व टोल फ्री क्रमांकही उपलब्ध होणार आहेत. 

- Video : लॉकडाऊनवाली शादी...! चक्क पोलिसांनीचं केलं 'तिचं' कन्यादान

बारामती मधील हॉस्पिटल्स, क्वॉरन्टाईन सेंटर व आयसोलेशन सेंटर याबद्दलची सविस्तर माहिती यात दिली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भितीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी व्यक्त केला. 

- पुणे शहर पोलीस दलातील ते पोलिस दांपत्य झाले कोरोनामुक्त!

सदरचे ॲप डाटाविव टेक्नॉलॉजीस यांनी विकसित केले असून बेअर प्रयास असोसिएशन यांनी नगरपरिषदेस विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. याप्रसंगी उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर उपस्थित होते.  

नागरिकांनी गुगल प्ले स्टोरवरुन अथवा https://play.google.com/store/apps/details?id=com.root.rakshakbnp  या लिंकवर जाऊन ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

Coronavirus : जिथून सुरुवात झाली तिथे होतोय शेवट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati Nagar Parishad invented BNP Cares app for Baramati citizens