Ajit Pawar News: आणि अजित पवार म्हणाले अध्यक्षमहोदय......

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण म्हटले की हास्याचे फवारे व त्यांनी काढलेले चिमटे हे समीकरण ठरलेलेच असते.
Ajit Pawar News
Ajit Pawar Newsesakal
Updated on
Summary

Ajit Pawar News: विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण म्हटले की हास्याचे फवारे व त्यांनी काढलेले चिमटे हे समीकरण ठरलेलेच असते.

बारामती - विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे भाषण म्हटले की हास्याचे फवारे व त्यांनी काढलेले चिमटे हे समीकरण ठरलेलेच असते. आपल्या बिनधास्त भाषणाच्या शैलीसाठी प्रसिध्द असलेल्या अजित पवारांनी आज बारामतीतील सभेतील भाषणा दरम्यान अचानकच अध्यक्ष महोदय....

असे म्हटल्यानंतर सभागृहात प्रचंड हशा झाला. आपल्याकडून विधानसभेतील भाषणाप्रमाणेच जाहिर भाषणात अध्यक्षमहोदय असा शब्द गेल्याचे अजित पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनाही बराच काळ हसू आवरले नाही..... या घटनेने वातावरण हलकेफुलके झाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत आयोजित राष्ट्रवादीच्या मेळाव्यात हा किस्सा घडला. अजित पवार यांनी आज शांतपणे पदाधिका-यांना पक्षासाठी वेळ देण्याचा सल्ला देत खडे बोल सुनावले. आपल्याकडे आलेल्या चिठ्ठयांचे वाचन करतानाच काही जण पनवलेलला जातात,

काही पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर आल्यावर त्यांनाच अधिक वेळ देतात, तुम्हाला संचालक करणार असे काही जण सांगतात तर तुम्ही व सुप्रिया सुळे बारामतीतून गेल्यावर आपणच आमदार खासदार आहोत, अशा थाटात काही जण वावरतात, अशा चिठ्ठयांचे अजित पवार यांनी जाहीर वाचन केल्याने हा रोख नेमका कोणावर याचीच नंतर चर्चा सुरु होती.

Ajit Pawar News
Ajit Pawar : राष्ट्रवादीसाठी पदाधिका-यांनी वेळ द्यावा

पदाधिका-यांनी लोकांशी नीट वागावे, माझ्यासारखे वागायची गरज नाही, असे म्हणताच पुन्हा एकदा सभागृहात हास्याचा स्फोट झाला. बूथ कमिटी कार्यकर्त्यांनी 25 कुटुंबासोबत संपर्क साधताना दुसराच संपर्क साधू नका, व्हॉटसअँपवर मेसेज पाठवू नका,

माझ्याकडे जर अशा तक्रारी आल्या तर मी सोडणार नाही, आणि अशा कृत्याने पक्षाचा फायदा होण्याऐवजी तोटाच होईल.... असेही सुनावले. नितीन गडकरी यांना मी ब-याय गोष्टी सांगितल्या असून ते अत्यंत सकारात्मक असतात, अशी पावती द्यायला अजित पवार विसरले नाहीत.

...तर सहज नाव वगळेन....

निवडणूकीच्या काळात विरोधी गटात जायच नाही, अशी तंबीच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिली. नाही...सहज गेलो होतो.... असली कारणे ऐकून घेणार नाही... तुम्ही सहज गेला तर तुमचे नाव वगळेन आणि मग मीही सहजच नाव वगळले, असे तुम्हाला सांगेन, असे अजित पवार म्हणताच पुन्हा हास्याचा स्फोट झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com