esakal | बारामतीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ओलांडला सहाशेचा टप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Patients

बारामतीतील रुग्णांनी वेगाने सहाशेचा टप्पा ओलांडल्यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात काळजी निर्माण झाली आहे.

बारामतीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येने ओलांडला सहाशेचा टप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती (पुणे) : शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या बुधवारी (ता.२६) पुन्हा वाढली. दिवसभरात तब्बल 32 जण कोरोनाग्रस्त आढळल्याने पुन्हा एकदा बारामतीकर चिंताग्रस्त झाले आहेत. बारामतीतील रुग्णाच्या संख्येने सहाशेचा टप्पा ओलांडला असून एकूण रुग्णसंख्या 614 वर गेली आहे. 

दरम्यान, तालुक्यातील अंजनगाव येथील एका रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाल्याने बारामतीतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा 30 वर गेला आहे. नियमितपणे होणारे मृत्यू पुन्हा एकदा बारामतीकरांसाठी काळजी वाढविणारे ठरले आहे.  

इंदापूर तालुक्याचा पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागणार; मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्त्वाचे निर्णय​

मंगळवारी (ता.२५) बारामतीमध्ये एकूण 82 स्वॅब नमुने आरटीपीसीआर तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 15 जणांचा अहवाल प्रतीक्षेत असून 67 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंगळवारी संध्याकाळनंतर आणि बुधवारी दिवसभरात बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 98 नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 74 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून बारामती शहरातील 18 आणि ग्रामीण भागातील 6 अशा 24 जणांचा अहवाल अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला आहे. 

वडिलोपार्जित मालमत्ता एकट्याला हवी आहे, तर...

बुधवारी दिवसभरात ग्रामीण रुग्णालय रूई येथे शासकीय अँटीजेन तपासणीसाठी 41 जणांचे नमुने घेण्यात आले होते त्यापैकी ग्रामीण भागातील 6 आणि बारामती शहरातील 2 अशा आठ जणांचा अहवाल अँटीजेन पॉझिटिव्ह आलेला आहे, त्यामुळे चोवीस तासातील एकूण रुग्णसंख्या 32 झालेली आहे. 

आता बारामतीची एकूण रुग्णसंख्या 614 झालेली आहे. तपासण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे सध्याचे चित्र आहे. बारामतीतील रुग्णांनी वेगाने सहाशेचा टप्पा ओलांडल्यामुळे पुन्हा एकदा लोकांच्या मनात काळजी निर्माण झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)