esakal | वडिलोपार्जित मालमत्ता एकट्याला हवी आहे, तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Stamp_Duty

वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप होणे अपेक्षित आहे. अनेकदा त्यांचे समान वाटप होत नाही. भाऊ आणि बहिणींचे हक्क डावलले जातात.

वडिलोपार्जित मालमत्ता एकट्याला हवी आहे, तर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोहनची वडिलोपार्जित शेत जमीन आणि मिळकत आहे. मोहनला तीन मुले आहेत. त्यापैकी मोठ्या मुलाबरोबरच ते राहतात. अन्य दोन्ही मुले स्वतंत्र राहत आहेत. मोहनला वडिलोपार्जित सर्व मालमत्ता मोठ्या मुलाच्या नावावर बक्षीसपात्र करावयाची आहे. मात्र, आता ती सर्व मालमत्ता बक्षीसपात्र करावयाची झाल्यास मोहनला रेडी-रेकनरमधील दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) भरावे लागणार आहे. 

ग्रामपंचायत सदस्याने लाटलेले अनुदान पुन्हा शासनाच्या खिशात; वाचा काय आहे प्रकरण​

त्याऐवजी मोहनला वडिलोपार्जित मालमत्ता तिन्ही मुलांमध्ये समान वाटप करावयाची असेल, तर त्यासाठी फक्त दोनशे रुपये खर्च येणार आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने वडिलोपार्जित मालमत्ता कुटुंबातील एकाच्याच नावावर करावयाची असेल, तर मुद्रांक शुल्क पाच टक्के आकारण्यासाठी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला आहे. 

वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप होणे अपेक्षित आहे. अनेकदा त्यांचे समान वाटप होत नाही. भाऊ आणि बहिणींचे हक्क डावलले जातात. दोनशे रुपयांमध्ये बक्षीसपत्र करून अनेकदा एक भाऊ वडिलोपार्जित मालमत्ता आपल्या नावावर करून घेतो. त्यातून वाद निर्माण होतो. हाणामारीपर्यंत हे वाद जातात. त्यातून खुनासारख्या घटनाही घडल्या आहेत. तसेच न्यायालयीन दाव्यांची संख्या देखील त्यातून वाढते आहे.

दौंड तालुक्यात मुगाला मिळाला 'इतका' बाजारभाव; चार तालुक्यांतून आवक सुरू

या सर्व प्रकाराला आळा बसावा, घरातील वाद मिटवावेत, यासाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने या संदर्भात कायद्यात दुरुस्ती करून वडिलोपार्जित मालमत्ता एकाच मुलाच्या नावावर बक्षीसपात्र करावयाची असेल, तर त्यासाठी मालमत्तेच्या रेडी-रेकनरमधील दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात यावे, अशी दुरुस्ती कायद्यात प्रस्तावित केली आहे. त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांना डावलून सर्व मालमत्ता हवी असल्यास, त्या मालमत्तेचा रेडी-रेकनरमध्ये जो दर आहे, त्या दराच्या पाच टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. 

लक्षात ठेवा :
- वडिलोपार्जित मालमत्ता एकाच्याच नावावर करण्यासाठी ५ टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार. 
- समान वाटप केल्यास फक्त दोनशे रुपये येणार खर्च. 
- कुटुंबातील वाद टाळण्यासाठी मदत होणार 
- सर्वांना समान न्याय मिळणार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image