In Baramati The number of patients affected by corona has dropped sharply
In Baramati The number of patients affected by corona has dropped sharply

बारामतीकरांना दिलासा! कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या झाली झपाट्याने कमी

बारामती : शहरात केलेला कडक लॉकडाऊन आता फलदायी निष्पन्न होत असल्याचे दिसत आहे. सात दिवसांच्या लॉकडाऊननंतर बारामतीतील रुग्णांचा आकडा थेट निम्म्याने कमी झाला आहे. गेल्या 24 तासात बारामतीत 58 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. बारामतीच्या रुग्णसंख्येचा आकडा आता 2113 पर्यंत गेला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झपाट्याने कमी होणारे रुग्णांचे प्रमाण हा बारामतीकरांसाठी दिलासा आहे. आगामी रविवारपर्यंत लॉकडाऊन कायम असल्याने व तपासणी वेगाने होणार असल्याने कोरोनाचा आलेख देखील खाली येईल, असा प्रशासनाला विश्वास वाटत आहे. एकीकडे तपासण्यांची संख्या वाढली असली तरी रुग्णांची संख्या कमी होते आहे ही बाब सर्वांसाठी दिलासादायक म्हणाली लागेल. 

बारामतीत काल आरटीपीसीआर 235 चाचण्या झाल्या, त्या पैकी 27 जण पॉझिटीव्ह आले असून 7 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. काल रॅपिड अँटीजेन तपासण्या 79 झाल्या त्यात 31 जण पॉझिटीव्ह आले. विशेष म्हणजे कालच्या तपासणीत शहरातील रुग्णसंख्या 23 असून ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 35वर गेली आहे. रुग्णांच्या संख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला असला तरी बरे झालेल्या रुग्णांची संख्याही आता एक हजारांवर गेली असून आज 1013 रुग्ण बरे झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. मृत्यूचा आकडा मात्र सातत्याने वाढतच असून आज मृत्यूचा आकडा 56 वर जाऊन पोहोचला. 

कोरोनानंतर मुलांमधील "पिम्स' आजारासंबंधी डॉक्‍टरांचा सल्ला, वाचा सविस्तर

तपासणीचा होईल मोठा फायदा....
बारामती शहरातील प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करण्याची मोठी मोहिम नगरपालिकेने हाती घेतली असून तीन दिवसात प्रत्येकाची तपासणी केली जाईल. यातून अनेक लक्षणे असलेले व नसलेलेही रुग्ण निष्पन्न होऊन साखळी तोडण्यास त्याचा फायदा होईल, असा विश्वास मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी व्यक्त केला आहे. 

 दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा
•    आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 2113
•    उपचाराखाली असलेले रुग्ण- 1138
•    आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 56
•    पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 601
•    सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 433
•    मध्यम लक्षणे असलेले- 65
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 37
•    व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 12
•    बरे झालेले एकूण रुग्ण- 1013

पुणेकरांनो, "आरटीओ'चे कामकाज आता सकाळी आठपासूनच ! 

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
•    रुई ग्रामीण रुग्णालय- 27
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 83
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 169
•    नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 80
•    नटराज प्रेरणा कोविड सेंटर- 42
•    बारामती हॉस्पिटल- 58
•    विविध खाजगी रुग्णालय- 75
•    घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 586
•    पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 8

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com