esakal | बारामतीत कोरोनाचा आणखी एक बळी  
sakal

बोलून बातमी शोधा

baramati one more covid 19 patient death

मारवाड पेठेमध्ये राहणा-या एका नामांकीत डॉक्टरांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याच परिसरातील एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे शहरात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.

बारामतीत कोरोनाचा आणखी एक बळी  

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : शहरातील कोरोनाने मृत्यूमुखी पडणा-यांचे प्रमाण सातत्याने कायम राहत असल्याने हे प्रमाण कमी कसे करायचे याची चिंताप्रशासनाला वाटू लागली आहे. 
बारामतीत काल संध्याकाळी मारवाड पेठेतील एका 76 वर्षीय वृध्द महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी या बाबत माहिती दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यामुळे आता बारामतीतील कोरोना मृत्यूचा आकडा 13 झाला आहे. या महिलेस कालच सकाळी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी तिच्या घशातील द्रावाचे नमुने घेण्यात आले होते. मात्र संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपर्यंत काल घेतलेल्या 34 जणांच्या नमुन्यांपैकी 25 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला असून, उर्वरित अहवालांची प्रतिक्षा आहे.

आणखी वाचा - विद्यापीठात तीन अभ्यासक्रमांचा प्रवेश सुरू 

मारवाड पेठेमध्ये राहणा-या एका नामांकीत डॉक्टरांचाही काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. आज पुन्हा त्याच परिसरातील एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे शहरात काहीसे चिंतेचे वातावरण आहे. या महिलेच्या मृत्यूबाबात आरोग्य विभागाकडूनही माहिती गोळा केली जात आहे. बारामतीतील एकूण रुग्ण संख्या आज सकाळी आठ वाजेपर्यंत 132 झालेली आहे.  दरम्यान 68 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून 51 रुग्ण उपचार घेत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे , मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंग पाळावे,  कोरोना सदृश्य लक्षणे असल्यास विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ सरकारी दवाखान्याशी संपर्क साधावा, दुखणे अंगावर अजिबात काढू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.