esakal | बारामतीकरांना मिळतोय दिलासा! एवढे कोरोना रुग्ण झाले बरे
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati People are getting relief from Corona

एकीकडे प्रशासनाने चेस द व्हायरस या मोहिमेअंतर्गत लोकांच्या घरापर्यंत जाऊन थेट तपासणीचा निर्णय घेतला असल्याने लोकांना आता दिलासा मिळू लागला आहे. तालुक्यात तीन गावातील सर्व ग्रामस्थांची तपासणी झाल्यानंतर आजपासून बारामती शहरातील नागरिकांची तपासणी सुरु झाली आहे. आज व शुक्रवारी ही मोहिम पार पाडली जाणार आहे. 

बारामतीकरांना मिळतोय दिलासा! एवढे कोरोना रुग्ण झाले बरे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : लॉकडाऊनचा परिणाम हळुहळू बारामती शहरात जाणवू लागला असून पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. काल दिवसभरात बारामतीत 70 रुग्ण पॉझिटीव्ह सापडले. शहरातील एकूण रुग्णसंख्या 2264 झाली असून बरे झालेले रुग्ण 1164 इतके आहेत. दरम्यान दोघांचा मृत्यू झाल्याने हा आकडा आता 58 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

हे वाचा - पुण्याचा चिराग फलोर "जेईई'मध्ये देशात बारावा; दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम

एकीकडे प्रशासनाने चेस द व्हायरस या मोहिमेअंतर्गत लोकांच्या घरापर्यंत जाऊन थेट तपासणीचा निर्णय घेतला असल्याने लोकांना आता दिलासा मिळू लागला आहे. तालुक्यात तीन गावातील सर्व ग्रामस्थांची तपासणी झाल्यानंतर आजपासून बारामती शहरातील नागरिकांची तपासणी सुरु झाली आहे. आज व शुक्रवारी ही मोहिम पार पाडली जाणार आहे. 

शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यानंतर 7 सप्टेंबरपासून बारामतीत 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे शहरातील वर्दळ थंडावल्याने रुग्णांची संख्याही वेगाने कमी झाली. दुसरीकडे रुग्ण शोधून काढून साखळी वाढू न देता ती तोडण्यासाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे देखील रुग्ण संख्या कमी झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा
•    आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 2264
•    उपचाराखाली असलेले रुग्ण- 1082
•    आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 58
•    पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 536
•    सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 408
•    मध्यम लक्षणे असलेले- 72
•    ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 50
•    व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 16
•    बरे झालेले एकूण रुग्ण- 1124

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
•    रुई ग्रामीण रुग्णालय- 26
•    सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 83
•    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 169
•    नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 78
•    नटराज प्रेरणा कोविड सेंटर- 47
•    बारामती हॉस्पिटल- 45
•    विविध खाजगी रुग्णालय- 84
•    घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 588
•    पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 9


ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप