बारामतीकरांनो, जरा जपून! कोरोना वाढतोय

मिलिंद संगई
Saturday, 28 November 2020

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोक गावभर हिंडत असल्याने संसर्ग वेगाने होत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे मत आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाने किमान 14 दिवस विलगीकरणात राहणे अनिवार्य असताना असे रुग्ण व त्यांच्या संपर्कातील नातेवाईकही गावभर फिरत असल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. 

बारामती : शहर व तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागल्याने बारामतीकरांनी कमालीची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. बारामतीत आज 61 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील लोक गावभर हिंडत असल्याने संसर्ग वेगाने होत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे मत आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाने किमान 14 दिवस विलगीकरणात राहणे अनिवार्य असताना असे रुग्ण व त्यांच्या संपर्कातील नातेवाईकही गावभर फिरत असल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती शहरात आज 28 तर ग्रामीण भागात 33 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. कोरोनाबाबत सर्वांनीच कमालीची काळजी घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक स्तरावर ज्येष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडायचे टाळावे, घरातही विलगीकरणातच राहिल्यास संसर्गाचा धोका कमी होतो, ज्यांना इतर व्याधी आहेत त्यांनीही कमालीची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी व्यक्त केले आहे. 

ज्यांना कोरोनाची लागण होते, त्यांच्या संपर्कातील लोकांना लक्षणे दिसायला किमान पाच दिवसांचा कालावधी लागतो, या काळात ते फिरत राहिल्याने त्यांचा संसर्ग इतरांना होतो, त्या मुळे कोरोनाग्रस्ताच्या निकट संपर्कातील नातेवाईकांनी स्वताःला दहा दिवस तरी विलगीकरणात ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बारामती तालुक्यात आजपर्यंत 4898 रुग्णसंख्या झाली असून त्या पैकी 4441 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर मार्चपासून आजअखेर 127 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याची रंगीत तालीम पूर्ण; दिल्लीहून विशेष सुरक्षा पथके दाखल

शिक्षकांबाबत दिलासादायक बातमी....
या पार्श्वभूमीवर बारामतीत आजअखेर 2021 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची कोरोना तपासणी झाली आहे, त्या पैकी फक्त 12 जण पॉझिटीव्ह आढळले असून उर्वरित सर्व जण शाळेत अध्यापन व इतर कामांसाठी जाऊ शकतात ही यात दिलासादायक बातमी आहे. 

काय काळजी घ्याल.....

 • कोठेही गेल्यास कोणाच्याही संपर्कात येणार असाल तर मास्क काढू नका. 
 •  मित्रमैत्रीणींसमवेत गप्पा मारताना मास्कचा वापर करा.
 •  ज्यांना सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आहेत त्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • प्रत्येक वेळेस सॅनेटायझरचा वापर आवर्जून करा, हात स्वच्छ धुऊन घ्या.
 •  बाहेर फिरणाऱ्यांनी घरी आल्यानंतर आंघोळ करणे गरजेचे. 
 • दररोज स्वच्छ धुतलेल्या मास्कचाच वापर करा, एकमेकांचा मास्क वापरु नका. 
 • दुकानदारांनी दुकानात मास्कशिवाय ग्राहकांना प्रवेश देऊ नये.
 • मास्क खाली करुन वावरणाऱ्यांना मास्क नाकावर घेण्यास सांगावे. 
 • दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचे नाव व मोबाईल क्रमांक याची नोंद असावी. 
 • कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्यास संपर्कातील नातेवाईकांनी किमान दहा दिवस विलगीकरणात राहावे. 

  आम्ही कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही तरी.. : छगन भुजबळ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati People should be careful cause Corona is growing