अजित पवारांना बारामतीकरांनी घातली भावनिक साद; पाहा काय?

मिलिंद संगई, बारामती
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

राजकारणातून संन्यास घेण्याच्या अटीवर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातमीने बारामतीत खळबळ माजली. अजित पवार निराश आहेत याची जाणीव झाल्यानंतर आपापल्या परिने त्यांना या निराशेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

बारामती शहर : ''तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यायचा की, नाही ते बारामतीकरांना ठरवू द्या...तुम्ही बारामतीकरांसाठी जे केलयं त्याची प्रत्येक बारामतीकराला जाणीव आहे, त्यामुळे हा निर्णय तरी, आम्हाला घेऊ द्या, अशी भावनिक साद अजित पवार यांना सोशल मिडीयातून बारामतीतील अनेक जण घालू लागले आहेत.
 
राजकारणातून संन्यास घेण्याच्या अटीवर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातमीने बारामतीत खळबळ माजली. अजित पवार निराश आहेत याची जाणीव झाल्यानंतर आपापल्या परिने त्यांना या निराशेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
 

ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनीही फेसबुकवर पोस्ट टाकून अशीच भावना व्यक्त केली आहे. किरण गुजर म्हणतात, ''गेली 34 वर्षे बारामतीकर सुख दुःखात, चांगल्या वाईट वेळेतही तुमच्याबरोबर आहेत, आम्हाला माहीत आहे की, कणखर, कडक स्पष्ट वक्तेपणा असणारे दादा हळव्या मनाचेही आहेत. जे दिसूनच देत नाहीत त्याला कर्तव्याच्या पाठीमागे ठेऊन वावरतात. तुम्ही अत्यंत भावनाशील आहात. आपल्यामुळे कुणालाही दुखाऊ नये याची काळजी घेत असताना तुम्ही सगळ्यांचीच मने जपली बऱ्याच वेळा मनाला मुरड घालुन जवळच्यांनाही गप्प बसवून बाजूला ठेवून बाकीच्यांची मने सांभाळलीत तुम्ही कायमच साहेबांचा आदर करीत आला आहात, काही झाले तरी, साहेबांना दुखावणार नाही यासाठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी, चालेल याबाबत तुम्ही कायमच ठाम आहात. सार्वजनिक जीवनातून तुम्ही बाजूला जाऊ शकत नाही. काही व्यक्ती या समाजासाठी असतात. नव्हे त्यांचा जन्मच लोकसेवेसाठी असतो हा इतिहास आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या पुरते नाहीत तर, सर्व बारामतीकरांचे आहात. तुम्ही तालुक्यावर निस्सिम प्रेम करता आहात, त्यामुळे आता तालुक्यातील जनतेला ठरवू द्या. समाजाला ठरवू दया की, दादांनी काय करायचे ते. तो आता आमचा हक्क, अधिकार आहे.
 

अन् बारामतीकरांनी सोडला सुटकेचा निश्वास​

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baramati People want to Decide about Ajit Pawar should retire from politics not