

Baramati Police Launch Early Morning Raids Arrest 135 Accused Including 65 Warrant Holders and 70 Wanted in Various Cases
esakal
बारामती: एखादे काम करण्याचे पोलिसांनी मनावर घेतले, नियोजनबद्ध पद्धतीने यंत्रणा कामाला लावली आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मोहीम राबवली, तर काय घडू शकते, याचे उत्तम उदाहरण बारामती शहर पोलिसांनी घालून दिले आहे. न्यायालयाचे पकड वॉरंट असतानाही पोलिसांना गुंगारा देणारे आणि विविध गुन्ह्यांमध्ये फरार राहून उजळ माथ्याने फिरणारे तब्बल १३५ आरोपी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.