esakal | बारामती : गुरुवारी पोलिस विभागाचा तक्रार निवारण दिन
sakal

बोलून बातमी शोधा

Police

बारामती : गुरुवारी पोलिस विभागाचा तक्रार निवारण दिन

sakal_logo
By
मिलिंद संगई ः सकाळ वृत्तसेवा

बारामती : पोलिसांकडे प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांचा जलद गतीने निपटारा व्हावा या उद्देशाने बारामती, दौंड, भोर उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. 9) तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या संकल्पनेतून या तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: पुणे : आदर्श घालून देणाऱ्या तरुणांचे आयुक्तांनी कौतुक करावे.

ज्या नागरिकांनी गुन्हा, मुद्देमाल मिळणे या बाबत उपविभागीय पोलिस अधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पोलिस अधीक्षक, पोलिस महासंचालक किंवा इतर वरिष्ठ कार्यालयात अर्ज केलेले असतील, त्यातील अर्जदार व गैरअर्जदार यांनी तक्रार निवारणासाठी संबंधित पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: पाच रुपयांत मनपा पीएमपीएलची बस सेवा

ज्या पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत प्रकरण असेल त्या पोलिस ठाण्यात गुरुवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत हजर राहावे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख गुरुवारी मंचर व आळेफाटा या पोलिस ठाण्यात, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते बारामती शहर व बारामती तालुका पोलिस ठाण्यात उपस्थित राहणार आहेत. या शिवाय उपविभागीय पोलिस अधिकारी इतर पोलिस ठाण्यात हजर राहतील.

loading image
go to top