esakal | बारामती पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

crime

बारामती पोलिसांकडून दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती

बारामती : शहर पोलिसांनी केलेल्या एका मोठ्या कामगिरीत चोरीला गेलेल्या वीस लाखांच्या 18 दुचाकी जप्त करत तिघांना अटक करण्यात आली. चोरटयांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आज पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.

या प्रकरणी पोलिसांनी योगेश विलास चिरमे (वय 23, रा. झारगडवाडी, ता. बारामती) याच्यासह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. अभिवन देशमुख, अतिरिक्त अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सखोल तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सहायक पोलिस निरिक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, बंडू कोठे, अजित राऊत, सायबर शाखेचे सहायक पोलिस निरिक्षक मोहिते, तेचन पाटील, गोपाळ ओमासे यांचे पथक तयार केले होते. यांनी संयुक्तरित्या प्रयत्न करुन या चो-या उघड केल्या.

हेही वाचा: पुणे जिल्ह्याला २० कोटींचा निधी !

सीसीटीव्हीचे फूटेज व तांत्रिक विश्लेषण यांच्या मदतीने पोलिसांनी योगेश चिरमे याचे नाव पुढे आले. त्याचाय शोध घेताना त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलांनाही पोलिसांनी सापळा लावून पकडले. त्यांनी बारामती शहरासह बारामती तालुका, फलटण, सासवड, दौंड या ठिकाणाहून 18 दुचाकी चोरल्याचे पुढे आले. या दुचाकी त्यांनी गजानन दत्तू चव्हाण, नीलेश उर्फ सोन्या चिलम उर्फ उदय मोहन शोवगन यांना विकल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून 20 लाखाच्या दुचाकी हस्तगत केल्या.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

loading image