बारामतीत पोलिसांचा हातभट्टीवर छापा

मिलिंद संगई
गुरुवार, 4 एप्रिल 2019

बारामती शहर - शहरातील आमराई परिसरातील हातभट्टीवर छापा टाकून शहर पोलिसांनी रात्री उशीरा ही हातभट्टी उध्वस्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून या हातभट्टीच्या माध्यमातून दारु गाळून ती विक्रीसाठी पाठविली जात होती. याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. यात दहा बॅरल रसायन व इतर साहित्य पोलिसांनी उध्वस्त केले. 

मोठा फौजफाटा घेऊन ही हातभट्टी पोलिसांनी उध्वस्त केली. मात्र हातभट्टी चालक पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी अवैध धंद्याविरुध्द फास आवळण्याची मोहिम हाती घेतली असल्याने सर्वच पोलिस ठाण्यांच्या कक्षेतील अवैध व्यवसायावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. 

स्थानिक पोलिसांना का दिसत नाही
पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची पथके येऊन विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर कारवाई करतात, स्थानिक पोलिसांना हे व्यवसाय दिसत नाहीत का, असा प्रश्न लोक उपस्थित करीत आहेत. जेथे अशा कारवाई होतील तेथील प्रभारी अधिका-यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द कारवाई व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे. 

Web Title: Baramati police raid on the liquor