बारामती पोलिसांची कारवाई, पिस्तूल आणि एक कोयता जप्त

crime_logo
crime_logo

बारामती शहर - लोकसभा निवडणूकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती शहर पोलिसांनी कारवाई करत एक पिस्तूल व एक कोयता अशी घातक हत्यारे जप्त केली. 
दरम्यान, शहरातील अवैध व्यवसायावर छापा टाकत मुदेदमाल हस्तगत केला आहे. 
बारामतीत एका गाडीतून पिस्तूल येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला होता. 

बारामतीनजिक लिमटेक येथे फौजदार सतीश अस्वर, सहायक फौजदार संदीपान माळी, पोलिस कर्मचारी रमेश केकाण, दादासाहेब डोईफोडे, रुपेश साळुंके, तुषार चव्हाण, अजित राऊत, तुषार सानप, नूतनकुमार जाधव, पोपट नाळे, सिध्देश पाटील यांच्या पथकाकडून तपासणी सुरु असताना एक निळ्या रंगाची स्विफ्ट न थांबता भरधाव वेगाने निघून गेली. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी पाठलाग करत खोरोची गावानजिक गाडी अडवली. या गाडीत पिस्तूल, तलवार सापडली. 

कारमधील राजेंद्र रामचंद्र सल्ले (रा. खोरोची, ता. इंदापूर), मनोहर पोपट काळभोर (रा. देशमुखवाडी, ता. माळशिरस) यांना ताब्यात घेतले गेले. कारचालक पप्पू राजेंद्र सल्ले (रा. खोरोची, ता. इंदापूर) हा फरार झाला. पप्पू सल्लेविरुध्द वालचंदनगर व इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे नारायण शिरगावकर व औदुंबर पाटील यांनी सांगितले. 

दुसरीकडे शहरात रात्रगस्त सुरु असताना मोटारसायकलवरुन निघालेल्या दोघांना पोलिसांनी हटकले तेव्हा करण दिलीप गव्हाळे व गंभीर उर्फ अजय मानसिंग गुजर, अशी नावे त्यांनी सांगितली. त्यातील करण दिलीप गव्हाळे (रा. चंद्रमणीनगर, आमराई, बारामती) याच्याकडे कोयता सापडला. हा कोयता त्याने शुभम संतोष ताटे यांच्याकडून आणला असल्याने ताटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

दुसरीकडे अवैध धंद्यावर छापे घालत पोलिसांनी 28300 रुपयांचा माल नष्ट केला. आमराईत केलेल्या कारवाईत सुदाम शंकर लोंढे याच्या राहत्या घरातील हातभट्टी तसेच पत्त्यांचा क्लब पोलिसांनी उध्वस्त केला. या शिवाय प्रमोद अनंत अहिवळे याच्या आमराईतील घराच्या बाजूस सुरु असलेली हातभट्टीही पोलिसांनी उध्वस्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com