Baramati News : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बारामतीत 334 घरांना अनुदान मंजूर

गेल्या एक वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेमधील बारामतीतील 334 घरांना शासनाकडून मंजूरी मिळाली आहे.
PM Awas Yojana
PM Awas Yojanaesakal

बारामती - गेल्या एक वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेमधील बारामतीतील 334 घरांना शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी या बाबत माहिती दिली.

बारामती नगरपालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्रमांक चार (स्वमालकीच्या जागेवर घरनिर्मिती) अंतर्गत प्रस्ताव तयार केलेला होता.

ऑक्टोबर 2022 मध्ये टप्पा क्रमांक पाच मध्ये 105 घरकुलांचा तसेच ऑक्टोबर 2023 मध्ये टप्पा क्रमांक सहा मध्ये 229 अशा एकूण 334 घरकुलांचा प्रस्ताव शासनमंजूरीसाठी पाठविण्यात आला होता. या सर्व 334 घरकुलांच्या प्रस्तावाला केंद्र शासनाची अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे.

बारामती शहरात उभारण्यात येणा-या या घरांसाठी केंद्र सरकारने आठ कोटी 35 लाख रुपयांचे अनुदानही मंजूर केलेले आहे. ज्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे प्रस्ताव दाखल केलेले आहेत, त्यांनी घराचे बांधकाम सुरु करुन अनुदानाचे प्रस्ताव नगरपालिकेकडे दाखल करावेत, असे आवाहन महेश रोकडे यांनी केले आहे.

ज्याच्याकडे किमान एक गुंठा जागा आहे त्यावर 325 स्क्वे.फूटांचे बांधकाम केल्यावर सामान्य नागरिकांना अडीच लाख व दिव्यांगाना साडेतीन लाख रुपयांचे अनुदान प्रदान केले जाते. या योजनेअंतर्गत बारामती शहरात वरील 334 घरकुलांचा समावेश करुन आतापर्यंत 834 घरांना या योजनेअंतर्गत अनुदान प्रदान करण्यात आले आहे.

नागरिकांनी प्रस्ताव सादर करावेत

ज्यांच्या प्रस्तावांना मंजूरी मिळाली आहे अशा लाभार्थ्यांनी बांधकाम सुरु करुन विहीत नमुन्यात अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावेत.

- महेश रोकडे, मुख्याधिकारी, बा.न.प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com