बारामती-पुणे लोकलसाठी प्रयत्न - सुप्रिया सुळे

Local
Local

बारामती शहर - दळणवळणाच्या दृष्टीने बारामती ते पुणे अशी रेल्वेची लोकलसेवा सुरू करण्याबाबत आपण रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करत असून, लवकर ही सेवा सुरू व्हावी, असा आपला प्रयत्न असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली.

बारामतीतील बांधकाम व्यावसायिकांनी बारामतीच्या संदर्भात विविध विषयांवर दिल्लीत आज ज्येष्ठ नेते शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्या वेळी सुळे यांनी ही माहिती दिली. यात प्रफुल्ल तावरे, सुरेंद्र भोईटे, अजित उलगडे, सुधीर शिंदे, प्रताप चव्हाण, प्रसाद गायकवाड, राजेंद्र इंगोले, विक्रांत तांबे, राजेंद्र खराडे, गणपत तावरे, राहुल खाटमोडे, अप्पासाहेब गावडे, सुनील चौधर, रोहित घनवट, भागवत चौधर आदी उपस्थित होते. 

बारामती- पुणे अशी लोकल सेवा सुरू झाली; तर त्याचा फायदा बारामतीकरांना होईल. हे अंतर वेगाने पूर्ण झाले; तर त्यामुळे काही जण बारामती- पुणे असे रोज जाऊन येऊन करतील, त्याचा फायदा बारामतीच्या विकासाला होईल, असे बांधकाम व्यावसायिकांनी नमूद केले. ही लोकल सुरू व्हावी, यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे सुळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com